Advertisement

कॅडबरी सिल्क आवडते? मग सिल्क-ए-हॉलिकचा भाग व्हा


कॅडबरी सिल्क आवडते? मग सिल्क-ए-हॉलिकचा भाग व्हा
SHARES

किस मी, क्लोज यूअर आईज अॅण्ड मिस मी, हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला आठवली असेल ती सिल्क चॉकलेट. डेरी मिल्कच्या विश्वात देखील सिल्क चॉकलेटनं आपली वेगळी ओळख निर्माण केली. आनंदी असा दु:खी असा वा कुठल्या टेंशनमध्ये असा सिल्क खाण्याला अधिक प्राधान्य देता. तुमच्यासारख्या सिल्क प्रेमींसाठीच कॅडबरी डेरी मिल्क सिल्कतर्फे एका इव्हेंटचं आयोजन केलं आहे. सिल्क ए हॉलिक असं या इव्हेंटचं नाव आहे.


संधीचं करा सोनं

तुम्ही सिल्क कॅडबरीचे चाहते आहात मग तुमच्यासाठीच सिल्क ए हॉलिक इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या गेम्स आणि क्यूजचं आयोजन केलं आहे. फक्त एवढंच नाही तर गेम्स आणि क्यूज शो जिंकणाऱ्यांना सिल्क वर्ल्डचा एक भाग होण्याची संधी मिळणार आहे. जिंकलात तर तुम्हाला त्यांच्या येत्या बिलबोर्ड अॅडमध्ये झळकण्याची संधी मिळणार आहे.



काय करावं लागणार?

१३ अाॅक्टोबरला तुम्हाला फक्त मालाड इथल्या इनऑरबिट मॉलमध्ये जायचं आहे. #HowDoYouSilk session या हॅशटॅगअंतर्गत तुम्हाला सिल्कबद्दल बोलायचं आहे. तुम्हाला सिल्क का आवडतं? तुम्ही कधी सिल्क खाता यावर तुम्हाला बोलायचं आहे. तसंच सिल्क संदर्भात काही प्रश्न विचारले जातील. जर त्यांना तुमची उत्तरं आवडली तर तुम्हाला अॅडमध्ये झळकण्याची आणि खास फोटोशुटची संधी मिळेल. या संधीसाठी तुमचं प्रोफाईल देखील पाहिलं जाईल.

आणखी काही?

सिल्क ए हॉलिक हे सेशन जिंकणाऱ्यांना फोटोशुट आणि अॅडमध्ये झळकण्याशिवाय आणखी एक गोष्ट मिळणार आहे. सिल्क, सिल्क बबली आणि सिल्क कॅरेमेलो या कॅडबरी तुम्हाला दिल्या जातील. तुम्हाला देण्यात येणाऱ्या सिल्क चॉकलेट तुमच्या आवडत्या सेलिब्रेटिसोबत शेअर करू शकता. म्हणजे तुम्हाला इथं तुमच्या आवडत्या सेलिब्रिटिंना भेटण्याची संधी मिळणार आहे.

काय : कॅडबरी डेरीमिल्क सिल्क, सिल्क ए हॉलिक
कुठे : इनऑरबिट मॉल, मालाड
कधी : १३ ऑक्टोबर, दुपारी १ वाजता


हेही वाचा

'या' पाच ठिकाणी घ्या हॉट चॉकलेटचा आस्वाद

चॉकलेटचे झाड!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा