Coronavirus cases in Maharashtra: 164Mumbai: 56Islampur Sangli: 24Pune: 18Pimpri Chinchwad: 13Nagpur: 10Kalyan: 6Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Vasai-Virar: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Palghar: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 5Total Discharged: 0BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

फ्रुट स्टफ कुल्फीची चव लय भारी


फ्रुट स्टफ कुल्फीची चव लय भारी
SHARE

अंगाची लाही लाही करणाऱ्या ऑक्टोबर हिटमध्ये गारेगार कुल्फी खाण्याची मजा काही औरच. त्यातून जर ही कुल्फी हटके असेल तर? मग काही विचारू नका. वाशीतील हिम क्रिम इथं तुम्हाला फळांमध्ये कुल्फी स्टफ करून दिली जाते. आहे की नाही भन्नाट?


कुल्फीची खासियत

आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फी चाखल्या असतील. कुल्फीचे वेगवेगळे फ्लेवर्स हे फळांपासूनच बनवतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण इथं चक्क फळांमध्येच तुम्हाला कुल्फी स्टफ करून दिली जाते. याला फ्रुट स्टफ कुल्फी असे म्हणतात. सफरचंद, संत्र, आंबा, डाळिंब, किवी, ड्रॅगन फ्रुट या फळांमध्ये कुल्फी स्टफ करून सर्व्ह केली जाते.हिम क्रिममध्ये फक्त फ्रुट स्टफ कुल्फी नाही तर वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पॉपसीकल देखील आहेत. पॉपसीकल म्हणजे बर्फाचा गोळा. त्याला कँडीसारखा आकार असतो. रबडी, इमली मसाला, काला खट्टा, मँगो डिलाईट, बेरी पंच असे वेगवेगळे प्रकारचे पॉपसीकल तुम्ही चाखू शकता.

कुठे : हिम क्रिम, शॉप ५२, प्लॉट ७३, वेल्फेर चेंबर्स, फेडरल बँक, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबईहेही वाचा

खवय्यांसाठी कुल्फी वॉफल्सची ट्रिट

या आईस्क्रीममध्ये दडलंय काय?
संबंधित विषय
ताज्या बातम्या