नाश्ता राजासारखा करा...

नाश्ता राजासारखा करा...
See all
मुंबई  -  

सांताक्रूझ - कुकीज, पॅनकेक्स आणि कस्टर्ड हा खूप चांगला नाश्ता मानला जातो. ऐकून असं वाटेल की सकाळी कुकीज, पॅनकेक्स आणि कस्टर्ड हा नाश्ता कसा काय चांगला असू शकतो. पण, हे खरं आहे की हा नाश्ता केला तर आपल्या शरीराला काहीच नुकसान होत नाही. तसंच हा नाश्ता केल्यास आपल्या कमरेच्या आकारावरही काही फरक पडत नाही. त्यामुळे तुमचं वजन देखील वाढणार नाही.

साखर, मैदा आणि बदामाच्या दूधापासून हे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे संपू्र्ण आहाराने भरपूर असा पौष्टीक नाश्ता तुम्हाला खाता येणार आहे. सुदृढ आयुष्यासाठी आपण संग्रहित किंवा शिजवलेल्या अन्नाबद्दल सावध असणे आवश्यक आहे. प्लास्टिकच्या भांड्यात बराच वेळ जेवण ठेवणंही टाळलं पाहीजे. तसंच जेवणासाठी अॅल्युमिनियम वस्तू आणि मायक्रोवेव्ह टाळले पाहिजे. त्यामुळे काचेच्या वस्तू आणि स्टील वस्तू उत्तम पर्याय आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.