• अमन खन्नाचे लक्ष्य महाराष्ट्र संघात स्थान मिळविण्याचे
SHARE

मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिशनच्या (एमएसएसए) १६ वर्षांखालील स्पर्धेत माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट या शाळेला तिसऱ्या विभागीय गटाचे जेतेपद मिळवून देत अमन खन्नाने मोलाची कामगिरी बजावली. जवळपास एका दशकाच्या कालावधीनंतर माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्टने या विजेतेपदाला गवसणी घातली. अाता या विजेतेपदानंतर अमन खन्नाचे लक्ष्य अाहे ते महाराष्ट्राच्या फुटबाॅल संघात स्थान मिळविण्याचे.बंगळुरू एफसीची संधी हुकली

१५ वर्षीय मिडफिल्डर अमन खन्नाने गेल्या वर्षी बंगळुरू एफसीच्या निवड चाचणी स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र त्याचे हे स्वप्न प्रत्यक्ष साकार होऊ शकले नाही. अमन खन्ना सध्या इंडिया रश एससीच्या १५ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करत असून नुकत्याच झालेल्या एआयएफएफच्या १५ वर्षांखालील लीगमध्ये अमनने तीन गोल झळकावण्याची करामत केली होती. त्याने एमडीएफएच्या १७ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्वही केले होते.


महाराष्ट्र आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धेनंतर काही दिवसांनी माझी आयसीएसई बोर्डाची १०वीची परीक्षा होती. नेमका परीक्षेदरम्यान मी आजारी पडल्याने मला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. अखेर तीन-चार दिवसांत मी सर्व विषयांचा अभ्यास करून परीक्षेला सामोरा गेलो. मला ७५ टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. पण वर्षभर केलेल्या मेहनतीचा फायदा मला झाला आणि मी ९२ टक्के मार्क मिळवू शकलो.
- अमन वर्मा, फुटबाॅलपटू


भारतीय संघातील स्थान खुणावतेय

आता भारताच्या १७ वर्षांखालील संघात स्थान मिळविणे, हेच अमन खन्नाचे लक्ष्य अाहे. “सुनील छेत्री हा माझा फेव्हरिट फुटबॉलपटू आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी वाटचाल करणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा मला राज्याच्या संघात स्थान मिळवावे लागेल. भारताच्या १७ वर्षांखालील संघातून खेळणे, हे माझे स्वप्न असून माझ्यासाठी ती अभिमानाची बाब असेल,” असेही अमन खन्नाने सांगितले.


हेही वाचा -

शिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल

'डी कंपनी'नं केल्या भारताच्या ३ टेस्ट मॅच फिक्स?

संबंधित विषय
ताज्या बातम्या