Advertisement

मुंबईच्या आधार प्रतिष्ठानची त्रिपुडेवर मात


मुंबईच्या आधार प्रतिष्ठानची त्रिपुडेवर मात
SHARES

'विफा वुमन फुटबॉल लीग'मधील 'ब' गटात गुरूवारी झालेल्या सामन्यात मुंबईच्या आधार प्रतिष्ठान संघाने नागपूरच्या त्रिपुडे स्पोर्ट्स अकादमीवर 2-0 अशी मात केली. हा सामना कुपरेज मैदानावर खेळवण्यात आला.

आधार प्रतिष्ठान संघाचे संपूर्ण सामन्यावर वर्चस्व होते. आधार प्रतिष्ठानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत त्रिपुडे संघाला एकही गोल करु दिला नाही. आधारच्या प्रिया तिवारीने 43 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर शेवटच्या मिनिटाला मलायका चौहान हिने गोल करत आघाडी 2-0 वर नेत संघाला सहज विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, एफसी पुणे सिटी विरुद्ध के. एस. ए. कोल्हापूर संघात झालेल्या सामन्यात पुणे सिटीने 1-0 च्या गोल फरकाने कोल्हापूरवर मात केली. पुणे संघाकडून एकमेव गोल मुरीयल अदम हिने नोंदवला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा