Advertisement

आयएसएल लीगमध्ये मुंबई सिटी एफसीचा पराभव


आयएसएल लीगमध्ये मुंबई सिटी एफसीचा पराभव
SHARES

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या सिझनमधील पहिल्याच सामन्यात मुंबई संघाला पराभव पत्करावा लागला. बेंगळुरू एफसीने रविवारी आपल्या घरच्या मैदानावर शानदार खेळाचे प्रदर्शन करत मुंबई सिटी एफसीला 2-0 ने मात दिली. हा सामना बंगळुरूच्या कंतीरावा स्टेडियमवर खेळवण्यात आला.


छेत्रीची भूमिका महत्त्वाची ठरली

यावेळी यजमान बेंगळुरू संघाने भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळत पहिल्याच सामन्यात शानदार कामगिरी केली. सुरुवातीपासून बेंगळुरू संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. यामध्ये गतवर्षी मुंबई संघातून हॅट्रिक करणाऱ्या सुनील छेत्रीची महत्त्वाची भूमिका ठरली.


बंगळुरू संघाचा विजय

या लढतीत पहिल्या सत्रात बेंगळुरूला एकही गोल करता आला नाही.पण दुसऱ्या सत्रात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळी दिसली. पण सुरुवातीला मुंबई संघाच्या मजबूत खेळीमुळे बेंगळुरूला एकही गोल करता आले नाही. पण नंतर मार्टिन आणि छेत्रीने आपल्या शानदार खेळाचे प्रदर्शन करत गोल केले. यावेळी छेत्रीने 41 आणि वाणीने 44 व्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईच्या गोलरक्षक अमरीदर सिंहने गोल अडवत यश मिळू दिले नाही. मुंबई सिटी एफसीने दुसऱ्या सात्रात चांगली खेळी केली. पण बेंगळुरूच्या खेळाडूंसमोर ती अयशस्वी ठरली.

संबंधित विषय
Advertisement