Advertisement

बीएमसी केंद्राने पटकावले बीपिन फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपद


बीएमसी केंद्राने पटकावले बीपिन फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपद
SHARES

शालेय अाणि ज्युनियर स्तरावर फुटबाॅलची लोकप्रियता वाढविणाऱ्या बीपिन फुटबाॅल अकादमीच्या ३१व्या अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धेत या वर्षी मुंबई महापालिका शाळांमधील फुटबाॅलपटूंनी अफलातून कामगिरी केली. बीएमसी केंद्राने उल्हासनगर अंबरनाथ केंद्राला पराभूत करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. कुमार राठोड हा विजेत्या संघाच्या विजयाचा हिरो ठरला.


कुमार राठोडचा डबल धमाका

चर्चगेट येथील कर्नाटक स्पोर्टिंगच्या मैदानावर रंगलेल्या बीपिन अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धेच्या अंतिम लढतीत बीएमसी केंद्राने सुरुवातीपासूनच अाक्रमक खेळ करत बलाढ्य उल्हासनगर अंबरनाथ केंद्राला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. कुमार राठोडच्या डबल धमाक्यामुळे बीएमसी केंद्राने २-० असा शानदार विजय मिळवून बीपिन स्मृती चषकावर नाव कोरले. मुंबईचे सहाय्यक पोलीस अायुक्त अाणि महाराष्ट्राचे माजी फुटबाॅलपटू प्रमोद साईल यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात अाले.


बीएमसी केंद्राची कौतुकास्पद वाटचाल

मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबाॅल असोसिएशनचे (एमडीएफए) अध्यक्ष युवासेना प्रमुख अादित्य ठाकरे यांनी फुटबाॅल विकासासाठी मुंबईत राबविलेल्या उपक्रमांचा लाभ उठवत महापालिका शाळांमधील फुटबाॅलपटूंनी केलेली कामगिरी कौतुकास्पद अाहे. स्पर्धा संयोजक सुरेंद्र करकेरा यांनी बीएमसी संघाच्या शानदार कामगिरीचे कौतुक केले अाहे.


हे अाहेत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू - कुमार राठोड (बीएमसी केंद्र)
विविध केंद्रांचे सर्वोत्तम खेळाडू - कासा प्रजापती (चर्चगेट), राजू चौहान (कुलाबा), सुनील राठोड (बीएमसी), यश टाक (उल्हासनगर अंबरनाथ), शुभम शिंदे (कांदिवली), प्रीत (विरार), यश मिस्त्री (अंधेरी).

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा