'फिफा अंडर - 17 विश्वचषक' जॅक्सनने भारतासाठी केला पहिला गोल, भारताचा दुसऱ्यांदा पराभव


SHARE

'फिफा अंडर - 17 विश्वचषक' या स्पर्धेत सोमवारी कोलंबियाच्या पेनालोसाने केलेल्या दोन गोलामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाचा हा दुसरा पराभव आहे. याआधी अमेरिका विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा 3-0 अशा फरकाने पराभव झाला होता.

भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यापेक्षा यावेळी चांगला खेळ केला. यावेळी कोलंबियाने 1-0 अशी आघाडी घेतली. पण थोड्या वेळाने भारतीय संघाने गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. पण शेवटच्या 83 व्या मिनिटात पुन्हा एकदा पेनलोसा याने गोल करत संघाला विजय मिळवून दिले. फिफा विश्वचषकाच्या या सामन्यात भारताच्या जॅक्सनने देशाकडून पहिला गोल करण्याचा मान मिळवला.

सुरुवातीच्या 10 मिनिटातच कोलंबियाने आपले वर्चस्व राखले. भारतीय संघाकडून देखील उत्कृष्ट आक्रमण केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. पण हळूहळू भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणला. 15 व्या मिनिटाला निनतोई आणि बोरिसने भारतासाठी चांगली संधी दिली. पण अभिजीत गोल करण्यास अयशस्वी ठरला. पण आधीच्या सामान्यापेक्षा सोमवारी भारतीय संघ बऱ्यापैकी खेळला. पहिल्या अर्ध्यावेळेलत दोन्ही संघाला एकही गोल करण्यात यश आले नाही.

दुसऱ्या सत्रात कोलंबियाने आक्रमण खेळी करून 1-0 अशी आघाडी घेतली. शेवटच्या 81 व्या मिनिटाला भारताच्या मिडफिल्डर जेक्सनने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर लगेचच 83 व्या मिनिटाला पेनलोसने दुसरा गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. पण भारताच्या या दुसऱ्या पराभवामुळे संघ बाहेर पडणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा - 

फिफा सामने बघायला जाताय? मग हे वाचा!

फिफा विश्वचषकात कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये? जाणून घ्या!


संबंधित विषय