Advertisement

बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये गतविजेत्या फ्लिट फूटर्सची विजयी सुरुवात


बोरीवली फुटबाॅल लीगमध्ये गतविजेत्या फ्लिट फूटर्सची विजयी सुरुवात
SHARES

गतविजेत्या फ्लिट फूटर्स फुटबाॅल क्लबने बोरीवली स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे अायोजित केलेल्या तिसऱ्या बोरीवली प्रीमिअर फुटबाॅल लीगमध्ये (बीपीएफएल) १-० असा विजय मिळवत अाश्वासक सुरुवात केली. बोरीवली पश्चिम येथील सेंट फ्रान्सिस डी असिसी हायस्कूलच्या ग्राऊंडवर एमडीएफएच्या मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत तुषार पुजारीने १०व्या मिनिटाला केलेला गोल फ्लिट फूटर्सच्या विजयात निर्णायक ठरला.


काॅलिन अब्रांचेस चमकला

दुसऱ्या सामन्यात, पिछाडीवर पडलेल्या मेरीलँड यूनायटेडला तारण्याचे काम काॅलिन अब्रांचेसनं केलं. त्यामुळे मेरीलँडला फ्रेंड्स स्पोर्टस क्लबवर ३-१ असा विजय मिळवता अाला. बेंझामिन झोलारने १०व्या मिनिटाला फ्रेंड्स क्लबला १-० अशी अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर ख्रिस्तोफर फर्नांडेसने मेरीलँडला ४१व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. मात्र अब्रांचेसने ६०व्या अाणि ७१व्या मिनिटाला केलेले गोल मेरीलँडच्या विजयात मोलाचे ठरले.

दर्शन शाह (गोराई एफसी) अाणि काॅलिन अब्रांचेस (मेरीलँड युनायटेड) यांनी पहिल्या दिवशी अापापल्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.


हेही वाचा -

शिव्या घाला, टीका करा, या सुनील छेत्रीच्या भावनिक अावाहनानंतर मुंबईतील सामना हाऊसफुल्ल

बार्सिलोना, युव्हेंट्सचे देव मुंबईत अवतरणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा