Advertisement

फुटबॉलची आवड आहे? मग या मोफत शिबिरात नक्की जा!


फुटबॉलची आवड आहे? मग या मोफत शिबिरात नक्की जा!
SHARES

कर्नाटक स्पोर्ट्स असोसिएशनने बालदिनाच्या निमित्ताने केएसए अॅम्बिशिअस फुटबॉल अकॅडेमी सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अकॅडेमीत प्रवेश घेणाऱ्या मुलांची निवड करण्याआधी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येईल. त्यानंतर यामधूनच या अकॅडेमीत मुलांची निवड करण्यात येईल. 


'यांच्या' सहकार्याने अकॅडेमी सुरू

भारताचे माजी फुटबॉलपटू स्टीव्हन डायस यांच्या सहकार्याने नॅशनल चॅम्पियनशिप आणि संतोष ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवलेले विजय शेट्टी यांच्यासह संतोष कोळी यांच्या सहकार्याने ही अकॅडेमी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या अकॅडेमीत प्रमुख प्रशिक्षकपदी डायस, तर उप प्रशिक्षकपदी विजय शेट्टी आणि संतोष कोळी हे असतील.


माझ्या करिअरची सुरुवात केएसए मैदानावरच झाली. काही मुलांमध्ये प्रतिभा असूनही अनेकदा संधी मिळत नाही, अशा मुलांना खेळाचे प्रशिक्षण देऊन भविष्यात चांगला खेळाडू घडवण्याचे माझे टार्गेट आहे.

स्टीव्हन डायस, माजी फुटबॉलपटू


'या' वयोगटातील मुलांसाठी मोफत शिबीर 

काही खेळाडू चांगले खेळत नाही. पण या शिबिराच्या माध्यमातून त्यांना काही टिप्स आणि कौशल्य देण्याचा प्रयत्न करेन. सुरुवातीला खेळाडूंना बेसिक गोष्टी शिकवल्या जातील. त्यानंतर हळूहळू त्यांची प्रगती व्हावी यावर भर दिला जाईल. हे शिबीर १२, १५ आणि 18 वयोगटातील मुलांसाठी मोफत असणार आहे. प्रशिक्षणार्थी खेळाडूंना बेसिक प्रशिक्षण देऊन २ आणि ३ डिसेंबरला होणाऱ्या शिबिरातून त्यांची अकॅडेमीत निवड केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा