Advertisement

रोनाल्डिन्होसमोर मुंबई वॉरियर्स गारद


रोनाल्डिन्होसमोर मुंबई वॉरियर्स गारद
SHARES

फुटसल प्रिमियर लीगच्या दुसऱ्या सीझनला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या सीझनमधील पहिला सामना दिल्ली ड्रॅगन्स आणि मुंबई वॉरियर्स यांच्यात झाला. यामध्ये दिल्ली संघाने मुंबईला ४-१ अशा फरकाने पराभव करत विजय मिळवला. या सीझनमधील पहिला सामना अत्यंत रोमांचक ठरला.

या लढतीत दिल्ली संघाचा कर्णधार, प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डीन्हो आणि मुंबई संघाचा कर्णधार गिग्स हे दोन्ही फुटबॉलपटू समोरासमोर होते. हा सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

यावेळी मुंबई संघाचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर टायगर श्रॉफ तर दिल्ली संघाची ब्रॅन्ड अॅम्बेसिडर सनी लीओनी देखील उपस्थित होती.
या सामन्यात रोनाल्डिन्हो याने एकट्याने हॅट्रिक लगावत संघाला विजयी करण्यास महत्त्वाची कामगिरी केली. रोनाल्डिन्हो याने सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या पाच मिनिटात पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पण मुंबई संघाला या सामन्यात एक गोल करण्यातच यश मिळाले.

पहिल्या टप्प्यातच दोन्ही संघ प्रत्येकी एक गोल करत बरोबरीत आले. दुसऱ्या सत्रापर्यंत सामना अनिर्णित राहिला. पण नंतर दिल्ली संघाने सामना नंतर नियंत्रणात आणला.
या लढतीत दोन्ही प्रसिद्ध फुटबॉलपटूने मैदानात आपल्या शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत रोनाल्डिन्होने सलग तीन गोल करत सामना ४-१ ने आघाडीवर आणला. पण मुंबईच संघाचा कर्णधार गिग्स याला आघाडी मिळवण्यात अपयश आले.


हेही वाचा - 

टायगर श्रॉफ जेव्हा फुटसल खेळतो


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा