टायगर श्रॉफ जेव्हा फुटसल खेळतो


टायगर श्रॉफ जेव्हा फुटसल खेळतो
SHARES

'मी लहानपणापासून फुटसल खेळतो. मला फुटसलची खूप आवड आहे. जर खेळायची संधी मिळाली तर माझे स्वप्न पूर्ण होईल आणि ते आता होणार आहे, असे टायगर श्रॉफ म्हणतो. यावेळी त्याने फुटसलचे काही स्टंटही करून दाखवले.

निमित्त होते, येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्रिमियर फुटसल लीगचे. रविवारी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रिमियर फुटसल लीगचे वॉईस चेअरमन ब्रिटटो, अभिनेता टायगर श्रॉफ उपस्थित होते. यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री सनी लिओन आणि आर्या हे देखील दिल्ली आणि इतर ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी राहणार आहेत. क्रिस्टल मुंबई वॉरियर्स असे या संघाचे नाव असणार आहे. ही जगातील सर्वात प्रसिद्ध अशी 20-20 फुटसल स्पर्धा आहे.
विशेष म्हणजे 15 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या स्पर्धेत सुरुवातीला 5 मिनिटे सेलेब्रिटी आणि फुटसल लिजेन्ड्स यांच्यामध्ये एक सामना होणार आहे. क्रिस्टल मुंबई वॉरियर्स संघाचे खेळाडू शुभम हा देखील यावेळी उपस्थित होता. मुंबई संघाच्या जर्सीचे देखील यावेळी अनावरण करण्यात आले.


हेही वाचा - 

भारतीय अंडर-17 फुटबॉल संघाची नवीन जर्सी

नेयमार ज्युनिअर्स फाईव्ह फुटबॉल स्पर्धेला सुरुवात


संबंधित विषय