Advertisement

नेयमार ज्युनिअर्स फाईव्ह फुटबॉल स्पर्धेला सुरुवात


नेयमार ज्युनिअर्स फाईव्ह फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
SHARES

17 वर्षाखालील फिफा विश्वचषकाच्या आधी नेयमार ज्युनिअर्स फाईव्ह ही जागतिक पातळीवरील फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात आली आहे. ही स्पर्धा एका नमांकित एनर्जी कंपनीतर्फे आयोजित करण्यात आली. फिफा या स्पर्धेची ही पात्रता पूर्व फेरी डी. वाय. पाटील स्टेडियममधील फुटसल अरेनामध्ये पार पडली. देशातील सहा शहरांपैकी नवी मुंबईला यू-17 विश्वचषकाचे यजमानत्व मिळाले आहे.

नेयमार जुनिअर्स फाइव्हच्या माध्यमातून भारतातील फुटबॉल चाहत्यांना स्थानिक पातळीवरील कौशल्ये वापरून प्रकाशात येण्याची आणि ब्राझीलमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.नेयमार ज्युनिअर फाइव्हच्या पात्रतापूर्व फेरीचे हे तिसरे पर्व 4 सप्टेंबर रोजी डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडले. या फेरीसाठी नवी मुंबईतील महाविद्यालयांमधील 30 हून अधिक संघ सहभागी झाले होते. त्यात डी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, डी. वाय. पाटील मॅनेजमेंट, डी. वाय. पाटील एमबीबीएस, डी. वाय. पाटील आर्किटेक्चर, डी. वाय. पाटील आरएआयटी, डी. वाय. पाटील फिजिओ, अमिटी, पीसीएसीएस, केबीपी, बीव्हीपी डेंटल इत्यादी महाविद्यालयांचा समावेश होता. डी. वाय. पाटील आरएआयटी आणि डी. वाय. पाटील फिजिओ महाविद्यालयांतील विद्यार्थिनींचा संघही या स्पर्धेत सहभागी झाला होता.अंतिम सामन्यात डी. वाय. पाटील मॅनेजमेंटने व्हीजेटीआयच्या संघाचा 1-0 असा पराभव केला. या समान्यात अतिरिक्त वेळेत स्वप्निल भंडलने अंतिम गोल लगावला. त्याने जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत होणाऱ्या नेयमार ज्युनिअर्स फाईव्ह या स्पर्धेच्या शहर पात्रतापूर्व फेरीत प्रवेश केला.


काय आहे नेयमार स्पर्धा?

नेयमार जुनिअर फाइव्हमध्ये दोन संघात प्रत्येकी पाच खेळाडू असतात. त्यात गोलरक्षकाचा समावेश नसतो. त्यांच्याकडे 10 मिनिटांचा कालावधी असतो. या कालावधीत आपले कौशल्य दाखवून त्यांना नेयमार ज्युनिअरवर प्रभाव टाकण्याची संधी मिळते. या फॉरमॅटमध्ये एका संघाने एक गोल केल्यावर विरुद्ध संघातील एक खेळाडू मैदानाबाहेर जातो. दहा मिनिटांनंतर ज्या संघाचे सर्वाधिक खेळाडू मैदानावर आहेत (गोल) किंवा विरुद्ध संघाचे सर्व खेळाडू मैदानाबाहेर गेले, तर मैदानावरील संघ जिंकतो. जर दोन्ही संघांनी लगावलेल्या गोलची संख्या सारखी किंवा एकही गोल झालेला नसेल, तर तो सामना अनिर्णीत समजला जातो. यामध्ये प्रत्येक संघात 16 ते 25 वयोगटातील खेळाडू असतात.नेयमार ज्युनिअर फाइव्ह 2018 या स्पर्धेच्या पात्रतापूर्व फेऱ्या (सप्टेंबर ते नोव्हेंबर 2017) आणि शहर पात्रतापूर्व फेऱ्या (जानेवारी ते फेब्रुवारी 2018) मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, दिल्ली, जयपूर, चंडीगढ, गुवाहाटी, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोची आणि शिलाँग या ठिकाणी आयोजित करण्यात येतील. यामध्ये विजेत्या संघांना नेयमार ज्युनिअर्स फाइव्हच्या मार्च 2018 मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सामन्यांमध्ये स्पर्धा करावी लागणार आहे. त्या स्पर्धेतील विजेत्या संघाला जुलै 2018मध्ये ब्राझीलमध्ये होणाऱ्या नेयमार ज्युनिअर्स 2018 या स्पर्धेच्या जागतिक पातळीवरील अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.हेही वाचा - 

फिफा अंडर-17च्या या प्रोमो साँगची फुटबॉल प्रेमींमध्ये क्रेझ!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा