• 'मुंबईचं माझ्या हृदयात खास स्थान'- सुनिल छेत्री
  • 'मुंबईचं माझ्या हृदयात खास स्थान'- सुनिल छेत्री
SHARE

भारतात काही दिवसांपूर्वीच झालेल्या अंडर १७ फिफा विश्वचषकाला फुटबॉलप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते 'हिरो इंडियन सुपर लीग' (आयएसएल) कडे. मुंबई सिटी एफसी विरुद्ध बंगळुरू एफसीमधील पहिला सामना येत्या सोमवारी बंगळुरूतल्या कांतीरवा स्टेडियमवर रंगणार आहे. यापूर्वी मुंबई एफसी संघातून खेळणारा प्रसिद्ध फुटबाॅलपटू सुनील छेत्री यंदा बंगळुरू एफसी संघाकडून खेळणार आहे. यंदा मुंबईविरोधात खेळणार असलो, तरी मुंबई एफसीला माझ्या हृदयात विशेष स्थान असल्याचं मत सुनीलने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं. फुटबॉलप्रेमींची मने जिंकणाऱ्या सुनील छेत्रीने मुंबईत झालेल्या 'आयएसएल'च्या कार्यक्रमात आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

सुनील २०१३ ते २०१४ असे दोन सिझन बंगळुरू एफसीकडून खेळला. त्यानंतर २०१५-१६ अशी दोन वर्षे तो मुंबई एफसी संघातून खेळला. पण लवकरच सुरू होणाऱ्या 'आयएसएल लीग'मध्ये तो पुन्हा बंगळुरू एफसी संघाकडून खेळणार आहे.


'किल्ला भक्कम ठेवण्याच्या प्रयत्न करेन'

सुनिल म्हणतो "मुंबई सिटी एफसीसाठी माझ्या ह्रदयात खास स्थान आहे. कारण आयएसएलमध्ये मी आतापर्यंत केवळ याच संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. संघाचे मालक, चाहते आणि एकूणच शहर अशा प्रत्येकाने माझ्यावर खूप प्रेम केलं तसेच चांगले संबध ठेवले. यावेळच्या मोसमात माझा सामना मुंबई सिटी एफसी विरुद्ध होणार आहे. हा एक विचित्र योगायोग आहे. फुटबॉलमध्ये असे क्षण तुमच्या वाट्याला येतात. त्यामुळे मी बेंगळुरू एफसीचा किल्ला भक्कम ठेवण्याच्या प्रयत्न करणार आहे''.
'या लिगसाठी उत्सुक'

बेंगळुरू एफसीकडून गोल करण्यात छेत्री आघाडीवर आहे.  मुंबई समोर असल्याने यंदा गोल केल्यावर जल्लोष करणार का? यावर तो म्हणाला ''गोल केल्यानंतर मी जल्लोष करत नाही, असं म्हटलं जातं, हे खरं आहे. चमकदार खेळाच्या जोरावर बंगळुरू एफसी संघाच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांसंमोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे. आता लवकरच हा संघ आणखी एक टप्पा गाठेल आणि आयएसएलमध्ये पदार्पण करेल.''


'सर्वस्वी वेगळा अनुभव'

''आम्हा सर्वांसाठी हे स्टेडियम विशेष आहे. घरच्या मैदानावर खेळताना आम्ही आत्मविश्वासाने एकमेकांना साथ देतो. आयएसएलमधील बंगळुरू एफसीच्या सहभागात बरीच अनिश्चितता होती; पण आता सर्वकाही व्यवस्थित झाल्याने मला खूप आनंद होत आहे. बंगळुरू एफसीचा खेळाडू म्हणून सहभागी होणं हा सर्वस्वी वेगळा अनुभव असेल, असं सांगत छेत्रीने बंगळुरू संघाचे कौतुक केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या