Advertisement

जेएमजे स्पोर्टस क्लब ठरला एमडीएफएच्या सेकंड डिव्हिजनचा विजेता


जेएमजे स्पोर्टस क्लब ठरला एमडीएफएच्या सेकंड डिव्हिजनचा विजेता
SHARES

जेएमजे स्पोर्टस क्लबने संपूर्ण मोसमात शानदार खेळाचे प्रदर्शन करत एमडीएफए लीगच्या सेकंड डिव्हिजनचे विजेतेपद पटकावले अाहे. परेलच्या सेंट झेवियर मैदानावर रंगलेल्या सेकंड डिव्हिजनच्या अंतिम सामन्यात जेएमजे स्पोर्टसने मदर तेरेसा फाउंडेशनचा १-० असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्ट्रायकर एल्विन फर्नांडेसने झळकावलेला एकमेव गोल जेएमजे स्पोर्टस क्लबच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. गेल्या वर्षी थर्ड डिव्हिजनचे जेतेपद पटकावणाऱ्या जेएमजे स्पोर्टस क्लबने सलग दुसऱ्या वर्षी चॅम्पियन ठरण्याचा मान पटकावला अाहे.


३०व्या मिनिटाला एल्विनचा गोल

अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात, दोन्ही संघांनी अाक्रमक पवित्रा स्वीकारल्यामुळे सामन्याच्या अखेरपर्यंत रंगत कायम होती. जेएमजे स्पोर्टसने एल्विन फर्नांडेसने ३०व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे सामन्यात अाघाडी घेतली होती. डॅनी फर्नांडेसच्या पासवर ताकदवान असा फटका लगावत एल्विनने गोल झळकावून जेएमजेला अाघाडीवर अाणले होते. त्यानंतर अखेरपर्यंत ही अाघाडी टिकवत जेएमजे स्पोर्ट्सने विजेतेपदावर नाव कोरले.


फर्स्ट डिव्हिजनमध्ये बढती

या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात जेएमजे स्पोर्टसला २-१ असे हरवणाऱ्या मदर तेरेसा फाऊंडेशनला मात्र या सामन्यात खेळ उंचावता अाला नाही. अाता ३० एप्रिल रोजी होणाऱ्या एमडीएफए अवाॅर्ड नाइटमध्ये विजेत्या अाणि उपविजेत्या संघांना गौरवण्यात येणार अाहे. मात्र जेएमजे स्पोर्टस अाणि मदर तेरेसा फाऊंडेशनला पुढील मोसमासाठी फर्स्ट डिव्हिजनमध्ये बढती देण्यात अाली अाहे.


हेही वाचा -

अोएनजीसीने जिंकले एमडीएफएच्या एलिट डिव्हिजनचे जेतेपद

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा