अोएनजीसीने जिंकले एमडीएफएच्या एलिट डिव्हिजनचे जेतेपद


SHARE

घानाचा स्ट्रायकर इनाॅक अन्नान याने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे अोएनजीसीने एमडीएफए लीगच्या एलिट डिव्हिजनच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कूपरेज ग्राऊंडवर रंगलेल्या या अखेरच्या लीग सामन्यात अोएनजीसीने गतविजेत्या एअर इंडियावर १-० असा विजय मिळवला. अोएनजीने यापूर्वी २०१४-१५ मध्ये एलिट डिव्हिजनचे जेतेपद पटकावले होते तर २०१५-१६ अाणि २०१६-१७ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.


असे ठरले विजेतेपद

याअाधीच्या सामन्यात पश्चिम रेल्वेकडून पराभूत झाल्यामुळे अोएनजीसी एअर इंडियापेक्षा दोन गुणांनी पिछाडीवर होता. त्यामुळे या सामन्यात अोएनसीजीला विजय अावश्यक होता. सुरुवातीपासूनच अाक्रमक खेळ करत अोएनसीजीने अापले इरादे स्पष्ट केले. दुसऱ्या सत्रात सेंटर-फाॅरवर्ड अन्नान याने गोल करत अोएनजीसीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेर अोएनजीसीने ३१ गुणांसह एमडीएफए लीगच्या एलिट डिव्हिडनचे विजेतेपद प्राप्त केले. एअर इंडियाला ३० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


विजेत्याला एक लाखाचे इनाम

एमडीएफए लीगच्या एलिट डिव्हिजनचा विजेता ठरलेल्या अोएनजीसीला चषक अाणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार अाहे. एअर इंडियाला उपविजेतेपदाची ट्राॅफी अाणि ७५ हजार रुपयांचे इनाम मिळेल. तर तिसऱ्या क्रमांकावरील यूनियन बँक अाॅफ इंडियाला २५ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल. ३० एप्रिल रोजी रंगणाऱ्या एमडीएफए अवाॅर्ड नाइटमध्ये विजेत्यांचा गौरव करण्यात येईल.


हेही वाचा -

पालिका शाळेतील युवा फुटबॉलपटूंना मिळणार जर्मनीत प्रशिक्षणाची संधी

एमडीएफए घडवणार नवे फुटबाॅल रेफ्री

संबंधित विषय
ताज्या बातम्या