Advertisement

मुंबईकरांसाठी मँचेस्टर युनायटेडच्या 'अाय लव्ह युनायटेड’ची पर्वणी


मुंबईकरांसाठी मँचेस्टर युनायटेडच्या 'अाय लव्ह युनायटेड’ची पर्वणी
SHARES

मुंबईतील मँचेस्टर युनायटेडच्या चाहत्यांना अापल्या लाडक्या खेळाडूंना चिअर-अप करण्याची संधी मिळाली तर त्यांच्या अानंदाला पारावार उरणार नाही. त्यांच्यासाठी ही एक अनोखी पर्वणीच असेल. मँचेस्टर युनायटेडचा बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला अाणि लोकप्रिय असा 'अाय लव्ह युनायटेड' हा कार्यक्रम मुंबईत रंगणार अाहे. मुंबईतील महालक्ष्मी येथील राॅयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबवर २० जानेवारीला होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान मँचेस्टर युनायटेड अाणि बर्नले यांच्यात होणाऱ्या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार अाहे. त्यामुळे मँचेस्टर युनायटेडच्या चाहत्यांना मनोरंजनासह फुटबाॅल सामन्याचाही अानंद लुटता येणार अाहे.



डेनिस इर्विन, लुईस साहा मुंबईत येणार

मँचेस्टर युनायटेडचे अॅम्बेसेडर डेनिस इर्विन अाणि क्लबचे महान खेळाडू तसेच माजी स्ट्रायकर लुईस साहा हे या कार्यक्रमासाठी मुंबईत येणार अाहे. युनायटेडच्या चाहत्यांसाठी हा कार्यक्रम मोफत असणार अाहे.


जिंका अोल्ड ट्रॅफर्डला जाण्याची संधी

'अाय लव्ह युनायटेड' हा कार्यक्रम भारतात तिसऱ्यांदा होत असून गेल्या मोसमाप्रमाणेच मँचेस्टर युनायटेडचे महान खेळाडू चाहत्यांशी संवाद साधणार असून स्थानिक संस्कृतीचे सादरीकरण, सामन्याअाधीचे विश्लेषण, मध्यंतरादरम्यान विश्लेषण केले जाणार अाहे. चाहत्यांना यावेळी मनोरंजनाचाही लाभ उठवता येईल. या कार्यक्रमादरम्यान स्पर्धा घेतली जाणार असून विजेत्याला अोल्ड ट्रॅफर्डला जाण्याची संधी मिळणार अाहे.


मॅन यूचे मर्यादित मर्कंडाइज मिळवण्याची संधी

मुंबईत रंगणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे चाहत्यांना 'अाय लव्ह युनायटेड'चे लिमिटेड एडिशन असलेले टी-शर्टस अाणि अन्य मर्कंडाइज विकत घेण्याची संधी मिळणार अाहे.


मँचेस्टर युनायटेडने भारतात तिसऱ्यांदा 'अाय लव्ह युनायटेड' कार्यक्रमाचे अायोजन केले अाहे. कोलकाता, मुंबई, बंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमाला तब्बल ११ हजार चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अाम्ही मुंबईत परत येणार अाहे. मुंबईत होणारा हा कार्यक्रम लोकप्रिय होईल, अशी अाशा अाहे.
- रिचर्ज अारनाॅल्ड, मँचेस्टर युनायटेडचे समूह व्यवस्थापकीय संचालक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा