Advertisement

मुंबई डीएफए संघाची कोल्हापूर डीएफए संघावर 12-1 ने मात


मुंबई डीएफए संघाची कोल्हापूर डीएफए संघावर 12-1 ने मात
SHARES

चेंबुरच्या आरसीएफएल मैदानावर गुरूवारी 'ऊर्जा-सीएपीएफ अंडर- 19 फुटबॉल टुर्नामेंट'मधील मुलींच्या ग्रुप 'ए' चा सामना झाला. या सामन्यात मुंबई डीएफए संघाने कोल्हापूर डीएफए संघाचा 12-1 च्या फरकाने धुव्वा उडवला.

मुंबई डीएफए विरुध्द कोल्हापूर डीएफए मध्ये रंगलेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने संपूर्ण सामन्यावर एकतर्फी वर्चस्व राखले होते. एकापाठोपाठ एक असे 12 गोल करत मुंबईच्या संघाने कोल्हापूर संघाला अक्षरश: जेरीस आणले. कोल्हापूरच्या संघाला मुंबईवर अवघा एक गोल करता आला.

मुंबई संघातील भाग्यश्री दळवी या सामन्यातील टॉप गोलर ठरली. भाग्यश्रीने 5 गोल करून मुंबईच्या विजयात मोठा हातभार लावला. त्याचप्रमाणे रितीका सहानी, कॅरेन पेस आणि अतीशा सहानी यांनी प्रत्येकी 2 गोल करत भाग्यश्रीला साथसोबत केली. तर, कोल्हापूर संघातून केवळ प्रतीक्षा मीतारी हिलाच एकमेव गोल नोंदवता आला.

याचप्रमाणे मुलांच्या ग्रुपमधील झालेल्या सामन्यात मुंबई डीएफएच्या संघाने नागपूर डीएफएच्या संघाला 3-0 ने सहज मात दिली. मुंबईच्या संघात रोहन शुक्ला याने 1 गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. तर त्यांनरचे दोन गोल मीत जैनने करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा