SHARE

मुंबई सिटी एफसीने रविवार इंडियन सुपर लीगच्या चौथ्या सीजनसाठी नवीन जर्सीचे अनावण केले. या नवीन जर्सीच्या डिझाइनमध्ये वांद्रे वरळी सी-लिंकही दाखवण्यास आले आहे.

मागच्या आयएसएल सीझनमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहचणाऱ्या मुंबई सिटी एफसीच्या जर्सीचा रंग निळा आणि हिरवा होता. पण या जर्सीमध्ये 'गोल्डन फ्रॅग्मेंट्स' वाढवण्यासाठी टी शर्टच्या अस्तीनवर सोनेरी बँड जोडला आहे. हा 'गोल्डन फ्रॅग्मेंट्स' मुंबईकरांना दर्शवतो. त्याचप्रमाणे मुंबईकरांचे हृदय किती मोठे आहे, ते कशाप्रकारे एकमेकांना मदत करण्यासाठी वेगवेगळे मार्ग काढतात, याचे प्रतिबिंब या जर्सीतून दाखवण्यात आले आहे.हेही वाचा - 

भारतीय अंडर-17 फुटबॉल संघाची नवीन जर्सी


संबंधित विषय
ताज्या बातम्या