Advertisement

दादरच्या सॅलव्हेशन शाळेचा उपांत्य फेरीत विजय


दादरच्या सॅलव्हेशन शाळेचा उपांत्य फेरीत विजय
SHARES

विलिंग्डन कॅथलिक जिमखान्यातर्फे आयोजित 30 व्या इंटर पॅरिश रिंक फुटबॉल टुर्नामेंट स्पर्धेत दादरच्या अवर लेडी सॅलव्हेशन आणि अंधेरीच्या सिक्रेड हार्ट या दोन्ही शाळांनी पुरुषांच्या उप-उपांत्य फेरीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ही स्पर्धा विलिंग्डन कॅथलिक जिमखानाच्या मैदानावर खेळवण्यात आला.


अवर लेडी सॅलव्हेशनचा विजय

होली फॅमीली विरुद्ध झालेल्या या लढतीत ब्रेस मिरींडाच्या एकमेव गोलामुळे अवर लेडी सॅलव्हेशन संघाला विजय मिळवता आले. दुसऱ्या लढतीत सिक्रेड हार्ट संघाने वांद्र्याच्या सेंट अँड्रयू पॅरीश शाळेला 1-0 ने मात देत विजय मिळवला.

याच दरम्यान झालेल्या मुलींच्या उपांत्य फेरीत इमॅक्युलेट कन्सेप्शन आणि पॅरीशदरम्यान झालेला सामना 3-3 ने बरोबरीत झाला. पण टाय ब्रेकरमध्ये इमॅक्युलेट संघाला माजी ज्युनियर इंडिया स्ट्रायकर कॅरेन पेसची मोलाची मदत मिळाली. टाय ब्रेकरमध्ये कॅरेनच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे संघाने 5-4 अशी बाजी मारत अतिंम फेरीत प्रवेश केला. 

यावेळी टाय ब्रकेरमध्ये इमॅक्युलेटकडून कॅरेन हीने एकटीने 3 गोल केले, तर इलीझर पेस आणि अदिती शेट्टी यांनी प्रत्येकी एक गोल केले. सेंट अँड्र्यूच्या शिमोना सलडान्हा हीने 3 गोल तर लयन धर्माई हीने एक गोल केला. हेही वाचा - 

एमडीएफएच्या सामन्यात कुलाबा स्पोर्टस् संघ विजयी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा