एमडीएफएच्या सामन्यात कुलाबा स्पोर्टस् संघ विजयी

 Parel
एमडीएफएच्या सामन्यात कुलाबा स्पोर्टस् संघ विजयी

मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन (एमडीएफए)च्या सेकंड डिव्हिजन सीझनमध्ये कुलाबा स्पोर्टस् संघाने विजय मिळवला. या संघाने प्रतिस्पर्धी चारोटर रुखी समाज संघाला ३-० अशा फरकाने मात देत सामना जिंकला. ही स्पर्धा बुधवारी परळ येथील झेवियर्स मैदानावर खेळवण्यात आली. कुलाबा स्पोर्टस् संघातील अफतार खान याने विसाव्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या या आघाडीमुळे प्रतिस्पर्धी संघावर थो़डा दबाव आला.

सेकण्ड हाफनंतर कुलाबा संघाच्या अमित सेमवल याने ४८ व्या मिनिटाला गोल करत पुन्हा आघाडी मिळवून दिली. यामुळे चारोटर संघ दबावाखाली आला. पण नंतर पुन्हा शानदार खेळ करत कुलाबाच्या सैफ शेखने ५८ व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. चारोटर रुखी समाज संघाच्या एकाही खेळाडूला गोल करण्यात यश आले नाही.

याआधी झालेल्या सामन्यात कास्टर बॉयने जुहू स्ट्रायकरला ५-१ अशा मोठ्या फरकाने मात देत विजय मिळवला. कास्टर संघाच्या वयने त्रिनिदाडे याने दोन गोल, तर मॅक्सी डिसिल्व्हा, डिन परेरा आणि ब्रेबॉर्न रॉड्रिग्ज यांनी प्रत्येकी एक गोल केला. जुहू संघाच्या रेगल डिसिल्व्हाला फक्त एक गोल करण्यात यश आले.हेही वाचा - 

मुंबईकरांना फुटबॉलमधील टॉप संघाचे सामने पाहण्याची सुवर्णसंधी

नेयमार ज्युनिअर्स फाईव्ह फुटबॉल स्पर्धेला सुरुवात


Loading Comments