झेविअर्स ग्राउंडवर तरुण स्पोर्टिंगची आगेकूच

 Parel
झेविअर्स ग्राउंडवर तरुण स्पोर्टिंगची आगेकूच
Parel, Mumbai  -  

मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या सामन्यात तरुण स्पोर्टिंग क्लबने राहुल मित्र मंडळ संघाला 4-1 च्या फरकाने हरवले. ही स्पर्धा गुरूवारी परळच्या झेव्हिअर्स ग्राऊंडवर झाली.

तरुण स्पोर्टिंग क्लबच्या तबीश मुल्ला याने 16 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. विश्रांतीनंतर तरुण स्पोर्टिंगच्या सलीम शेखने 41 व्या मिनिटाला गोल करत 2-0 ने आघाडी वाढवली. पाठोपाठ अजिंक्य उमलारे याने 45 व्या मिनिटाला गोल केल्यानंतर स्पोर्टिंग क्लब 3-0 ने सामना जिंकणार अशी शक्यता दिसत होती. मात्र राहुल मित्र मंडळाच्या अनिकेत चव्हाण याने 65 व्या मिनिटाला एक गोल नोंदवत आपल्या संघाचा हुरुप वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु तीन मिनिटानंतर तरुण स्पोर्टिंगच्या अब्दुल दोहाडवाला याने 68 व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तसेच याआधी कुलाबा स्पोर्ट्स अकादमी विरुद्ध युनायटेड एफसीमध्ये झालेल्या लढतीत कुलाबा स्पोर्ट्स अकादमीने युनायटेड एफसीला 3-0 अशा फरकाने पराभूत केले. कुलाबा संघाच्या चित्रेश तांडेल, वंदन मेहेर आणि केवल पगधरे यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला सहज विजय मिळवून दिला.

Loading Comments