मुंबईत टीएसजी फुटबाॅल स्कूलची स्थापना


मुंबईत टीएसजी फुटबाॅल स्कूलची स्थापना
SHARES

द स्पोर्टस गुरुकुलने मुंबईतील खेळांना तसेच शारीरिक तंदुरुस्तीला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे अायोजित केली जातात. मात्र अाता द स्पोर्टस गुरुकुलतर्फे एरिक बेन्नी स्पोर्टस मॅनेजमेंट अाणि जर्मनीतील ड्यूएश्च फुटबाॅल इंटरनेटतर्फे मुंबईत टीएसजी फुटबाॅल स्कूलची स्थापना करण्यात अाली.


अाता हौशी फुटबाॅलपटूंना अापल्यातील कौशल्य सिद्ध करण्यासाठी टीएसजीने एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली अाहे. त्याचबरोबर प्रशिक्षकांनाही व्यावसायिक बनण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार अाहे, असे टीएसजीचे सहसंस्थापक परेश कोठारी यांनी सांगितले.


तीन ठिकाणी केंद्राची स्थापना

टीएसजी फुटबाॅल स्कूल हे तीन ठिकाणी उघडण्यात येणार अाहे. सांताक्रूझ, वडाळा अाणि चांदिवली येथे ही केंद्रे असतील. या ठिकाणाहून खेळाडूंची अंतिम निवड झाल्यानंतर कुलाबापासून ते कांदिवली-मालाडपर्यंत १५ ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार अाहे. या शिबिरात खेळाडूंना अांतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्याकडून भारत अाणि परदेशातील व्यावसायिक खेळाडू सराव करवून घेतील.


टीएसजीने क्रीडा प्रशिक्षण अाणि शारीरिक शिक्षण देण्यात मोलाचा वाटा उचलला अाहे. जवळपास १००० पेक्षा जास्त मुलांना प्रशिक्षण देणे, हेच अामचे मुख्य उद्दिष्ट अाहे. त्यांच्यासाठी अाम्ही स्पेशल ट्रेनिंग प्रोग्रॅम तयार केला अाहे. तरुणांना अापले फुटबाॅल करिअर घडवता यावे, असा हा प्रोग्रॅम असेल. खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षण देणे अाणि प्रशिक्षकांना शिक्षित करणे, हेच अामचे ध्येय अाहे.
- एरिक बेनी

संबंधित विषय