Advertisement

युवा खेळाडू भारतीय फुटबॉलचं भविष्य - प्रफुल पटेल


युवा खेळाडू भारतीय फुटबॉलचं भविष्य - प्रफुल पटेल
SHARES

सध्या फुटबॉल या खेळाला तरुणांची पसंती मिळत आहे. फुटबॉलप्रेमींचे लक्ष सध्या भारतात होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेकडे लागले आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने 16 वर्षांखालील मुलांना फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी 'जस्ट प्ले' या उपक्रमाची घोषणा गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात करण्यात आली. 

फुटबॉल फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल पटेल, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदीत्य ठाकरे, युएफा प्रशासन प्रमुख सिरील पेल्लेवट, एफएफच्या संचालिका मोया डॉड यावेळी उपस्थित होत्या. 

यावेळी प्रफुल पटेल म्हणाले, जागतिक फुटबॉल क्रमावारीमध्ये भारताने अव्वल 100 स्थानांमध्ये प्रवेश केला हे भारतीय फुटबॉलसाठी खरतर मोठे यश आहे. पण अव्वल 50 स्थानांमध्ये प्रवेश केल्यानंतरच मी आनंद साजरा करेन, भारतीय संघाने केलेल्या प्रगतीचा आनंद असून, सर्व खेळाडू प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मी अभिनंदन करतो. माझी इच्छा आहे की, भारताने अव्वल 10 मध्ये यावे. पण त्या आधी अव्वल 50 मध्ये येणे उचित ठरेल. भारतात होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमुळे नक्कीच भारतीय फुटबॉलला त्याचा फायदा होईल. युवा खेळाडू भारतीय फुटबॉलचे भविष्य आहे तसेच भविष्यात भारतीय फुटबॉल नक्कीच उंची गाठेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा