ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख १६ हजार ४१४ रुग्ण आढळले आहेत. यामधील १ लाख ८७७ रुग्ण बरे झाले आहेत. ठाणे जिल्ह्य़ात आता १२ हजार १८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे शहरातही कोरोना नियंत्रणात आल्याचं दिसून येत आहे. ठाण्यातील नौपाडा, घोडबंदर या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. मात्र, आता येथील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महापालिका प्रशासनाला यश येऊ लागलं आहे.
जुलै महिन्यात ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. लाॅकडाऊन उठवल्यानंतर रुग्णवाढीच्या वेगाकडं आरोग्य यंत्रणांचं लक्ष होतं. मागील १५ दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. एक महिन्यापूर्वी ठाणे जिल्ह्य़ात रोज १५०० च्या आसपास नवीन कोरोना रुग्ण आढळत होते. ही रुग्णसंख्या आता ७०० ते ८०० वर आली आहे.