Advertisement

'भाटिया'तील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३५ वर

भाटिया रुग्णालयातील आणखी १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे

'भाटिया'तील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३५ वर
SHARES

मुंबईतील ताडदेव येथील भाटिया रुग्णालयातील आणखी १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. भाटिया रुग्णालयात ८ एप्रिलला तीन करोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून नवीन रुग्णांना दाखल करणे बंद करण्यात आलं होतं. 

भाटिया रुग्णालयात ३ करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १४ जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे १५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या चाचण्या १० एप्रिलला केल्या गेल्या. याचा अहवाल सोमवारी आला. यामध्ये देखील आणखी ११ जणांना करोनाची बाधा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.

या रुग्णालयातील १५९ कर्मचाऱ्यांच्या चाचण्या नकारात्मक आल्या असून, त्यांना घरातच वेगळं राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बाधित रुग्णांच्या तसंच, कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या आणि चाचणी नकारात्मक आलेल्या रुग्णांना मात्र रुग्णालयातच वेगळं ठेवण्यात आलं आहे. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलनंतर भाटिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठया प्रमाणावर करोनाची बाधा झाली आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ५२ कर्मचाऱ्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा