Advertisement

ठाण्यातल्या 'या' गावात १०० टक्के लसीकरण, प्रशासनाकडून सत्कार

ठाण्यातल्या एका गावातील नागरिकांचं शंभर टक्के लसीकरण झालं आहे.

ठाण्यातल्या 'या' गावात १०० टक्के लसीकरण, प्रशासनाकडून सत्कार
SHARES

कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ठाण्यातल्या एका गावातील नागरिकांचं शंभर टक्के लसीकरण झालं आहे. या निमित्तानं अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत मुरबाड तालुक्यातील नारिवली ग्रामपंचायतीचा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

नारिवली ग्रामपंचायतीनं गावातील सर्व नागरिकांना १०० टक्के पहिला डोस तर ९८ टक्के दुसरा डोस दिला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोवीड प्रतिबंध लसीकरण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला आहे.

यापुढेही जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती लसीकरण मोहिमेत चांगले काम करतील, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे", असे उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी या कार्यक्रमात सांगितले.

देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा सत्कार समारंभ झाला. नारिवली गावाच्या सरपंच देवयानी भोईर, उपसरपंच कल्पेश सोरसे, ग्रामसेवक निलेश गोरले, सदस्य योगेश भोईर यांनी हा सत्कार स्विकारला.


हेही वाचा

चिंतादायक, मुंबईत ३, ६०० हून अधिक रुग्णांची नोंद

पालिका बूस्टर डोससाठी पात्र नागरिकांची यादी तयार करतेय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा