Advertisement

चिंतादायक, मुंबईत ३, ६०० हून अधिक रुग्णांची नोंद

कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.

चिंतादायक, मुंबईत ३, ६०० हून अधिक रुग्णांची नोंद
(Representational Image)
SHARES

कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल ५ हजार ३६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार १९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने पाच हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात गुरुवारी १९८ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत ४५० ओमिक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १२५ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

राज्यात सध्या १८ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ लाख ७ हजार ३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के आहे.

सध्या राज्यात १ लाख ३३ हजार ७४८ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर १०७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६, ८८ , ८७, ३०३ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आज ३ हजार ६७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाच मृत्यू नाही. याशिवाय, ३७१ जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ४९ हजार १५९ वर पोहचलीय. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 505 दिवसांवर पोहचलाय.



हेही वाचा

पालिका बूस्टर डोससाठी पात्र नागरिकांची यादी तयार करतेय

१५ ते १८ वयोगटातील ६० लाख मुले लसीकरणासाठी पात्र

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा