Advertisement

पालिका बूस्टर डोससाठी पात्र नागरिकांची यादी तयार करतेय

शहरातील ओमिक्रॉन आणि कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पालिका कठोर उपाय करत आहे.

पालिका बूस्टर डोससाठी पात्र नागरिकांची यादी तयार करतेय
SHARES

शहरातील ओमिक्रॉन आणि कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) जानेवारी २०२२ पासून टप्प्याटप्प्यानं बूस्टर डोस देण्यास सुरुवात करेल. यामध्ये ६० पेक्षा जास्त वर्षांवरील रुग्ण, आरोग्य सेवा आणि आघाडीवर असलेल्या कामगारांचा समावेश आहे.

यासोबतच अधिकारी आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांची यादी देखील तयार करत आहेत जे COVID-19 लसीचा बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत, जे दुसऱ्या डोसनंतर नऊ महिन्यांनी दिले जावे.

तथापि, असे समोर आले आहे की, अंदाजे १.३ दशलक्ष नागरिक बूस्टरसाठी पात्र आहेत, जे कोरोनाव्हायरशी लढा देण्यासाठी सावधगिरीचा एक उपाय म्हणून दिले जातील.

याशिवाय, असंही नमूद करण्यात आलं आहे की, जानेवारीमध्ये फक्त ५०,००० ज्येष्ठ नागरिक तिसरा डोस घेण्यास पात्र असतील.

दरम्यान, प्रशासकिय संस्थेच्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, अचूक आकडेवारीचा अंदाज नाही परंतु ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांपैकी बहुसंख्य लोक आजारानं ग्रस्त असतील. पुढे, सुमारे ०.३ दशलक्ष आरोग्य आणि आघाडीचे कर्मचारी देखील तिसऱ्या डोससाठी पात्र असतील.

पालिका अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, ते किशोरवयीन मुलांचे लसीकरण आणि तिसरा डोस देण्यासाठी केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतील.

अहवालानुसार, मुंबईत ४८,१४४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. बुधवार, २९ डिसेंबर रोजी शहरात प्रशासित केलेल्या लसीची संख्या १७,८९०,५९५ झाली आहे.

शिवाय, महानगरपालिका आता ३ जानेवारीपासून १५-१८ वयोगटातील सुमारे ०.९२० दशलक्ष किशोरवयीन मुलांसाठी कोविड-१९ लसीकरण देईल. ज्यासाठी त्यांनी किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण करण्यासाठी शहरातील महाविद्यालयांशी करार करण्याचा निर्णय घेतला.



हेही वाचा

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'बांद्रा वंडरलँड' बंद

१५ ते १८ वयोगटातील ६० लाख मुले लसीकरणासाठी पात्र

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा