Advertisement

मुंबईत कोरोना कहर सुरूच, मंगळवारी १० हजार नवे रुग्ण

मंगळवारी मुंबईत १० हजार ३० नवीन कोरोना रुग्ण आढळले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे.

मुंबईत कोरोना कहर सुरूच, मंगळवारी १० हजार नवे रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी मुंबईत १० हजार ३० नवीन कोरोना रुग्ण आढळले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्येचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. तर ३१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी ७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ८२ हजार ४ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ८१ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत सध्या ७७ हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ३१ मृतांपैकी १९ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये २० पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता अवघ्या ३८ दिवसांवर आला आहे. ३० मार्च ते ५ एप्रिल पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.७९ टक्के झाला आहे.

मुंबई महापालिकेने चौपाट्या, ॲन्टिजेन टेस्टींग, मायक्रो कंटेंटमेंट झोन आणि चाचण्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबईतील चौपाट्या आणि समुद्रकिनारे ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. तर खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करता येणार नाही. लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करुन त्याचा रिपोर्ट पालिका प्रशासनास कळवावा लागेल. लक्षणे असलेला रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास आणि हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असल्यास तेथेच ॲडमिट होईल आणि बेड नसल्यास वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून नजीकच्या केंद्रात त्याला दाखल केले जाईल.

५ किंवा ५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या मुंबईतील इमारती आता मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून ओळखल्या जातील. अशा इमारतीबाहेर मायक्रो कंटेंटमेंट झोनचा बोर्ड लावाला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनमधील सर्व निर्बंध आणि नियम पाळले जाण्याची जबाबदारी सोसायटीवर राहील. पहिल्यांदा नियम मोडल्यास सोसायटीला १० हजार रुपये दंड आकारला जाईल. त्यानंतर प्रत्येकवेळी जितक्या वेळा नियम मोडले जातील त्यावेळी २० हजार रुपये दंड आकारला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनच्या इमारतीसमोर एक पोलीस कर्मचारी नेमला जाणार आहे.



हेही वाचा

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा