Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी १०८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी (१८ ऑक्टोबर) १०८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २०० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी १०८ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत रविवारी (१८ ऑक्टोबर) १०८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २०० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर नवीन पनवेल येथील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ११, नवीन पनवेल १०, खांदा काॅलनी ५, कळंबोली १३, कामोठे २६, खारघर ३२, तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल २६ नवीन पनवेल २०, कळंबोली ३०, कामोठे ५६, खारघर ६२, तळोजा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २२३६५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २०६१९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५१२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १२३४ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. संबंधित विषय
Advertisement