Advertisement

लग्नातील जेवणामुळे ११ मुलांना विषबाधा

११ आदिवासी मुलांना अन्न विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.

लग्नातील जेवणामुळे ११ मुलांना विषबाधा
(Representational Image)
SHARES

सोमवारी, १ फेब्रुवारी रोजी एका विवाह सोहळ्यात जेवणानंतर पाच ते दहा वर्षांच्या ११ आदिवासी मुलांना अन्न विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सर्व मुलांवर कासाच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून ते स्थिर आहेत.

डहाणूतल्या किरत गावातील ही घटना आहे. गावात लग्नाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू असल्यानं मुलांना जेवण दिलं गेलं. जेवण घेतल्यानंतर ते पुन्हा समारंभात परत आले. काहींनी मळमळ, उलट्या आणि पोटदुखीची तक्रार केली ज्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. वांग्याची रसभाजी आणि ज्यूस यासह सर्व अन्न तपासणी करण्यासाठी पाठवलं आहे.

डहाणू तालुका आरोग्य अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आणि मुलांना रुग्णालयात दाखल केलं. समारंभ सुरू असताना मुलां व्यतिरिक्त कुणी जेवलं न्वहतं.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा