Advertisement

चिंताजनक! कोरोना रुग्णांनी राज्यात 20 हजारांचा टप्पा ओलांडला, तर शनिवारी 48 मृतांची नोंद

शुक्रवारी आणि शनिवार या दोन दिवसात तब्बल 85 जणांचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण आहे.

चिंताजनक! कोरोना रुग्णांनी राज्यात 20 हजारांचा टप्पा ओलांडला, तर शनिवारी 48 मृतांची नोंद
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात शनिवारी  कोरोना रुग्णांनी 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी दिवसभरात 1165 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात 48 जणांचा बळी गेला आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवसात सर्वाधित मृत्यू शनिवारी झाल्याचे सांगितले जात आहे. तर 330 जणांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 20 हजार 228 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणि शनिवार या दोन दिवसात तब्बल 85 जणांचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या  2 लाख  27 हजार 804 नमुन्यांपैकी  2 लाख 06  हजार 481 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  20 हजार 288 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख  41 हजार 290  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर  शुक्रवारी आणि शनिवारी  दोन दिवसात 85 जणांचा महामारीने  बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या आता 779 इतकी झाली आहे.

 शनिवारी मृत पावलेल्या 48 नागरिकांमध्ये मुंबईतील 27 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहर 9, पुणे जिल्हा 1, मालेगाव 8, नांदेड,  अकोला आणि अमरावतीत प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या 21  मृत्यूमध्ये पुरूष आणि 27 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 27 रुग्ण आहेत तर 18 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षाच्या खालील आहेत. या 39 मृतांपैकी 29जणांमध्ये (72 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती

1) कोरोना बाधित रुग्णांमधील 59 टक्के म्हणजेच 5228 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे विरहित आहेत. 

2) 39 टक्के म्हणजेच 3209 रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्येम लक्षणे आढळून आली आहेत.

3) 5 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 म्हणजेच 3 टक्के नागरिकांना आँक्सीजनची आवश्यकता, तर 92 रुग्ण म्हणजेच 1 टक्का रुग्ण व्हँन्टीलेटरवर आहेत. 

 4) 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात आहेत.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा