Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ११४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१२ ऑक्टोबर) ११४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १६० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ११४ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (१२ ऑक्टोबर) ११४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १६० रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर ७ मृत्यूंची नोंद झाली असून कामोठे आणि खारघर येथील प्रत्येकी एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १६, नवीन पनवेल १२, खांदा काॅलनी ३, कळंबोली १४, कामोठे ३५, खारघर ३२, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ९,  नवीन पनवेल ३४, कळंबोली ३१, कामोठे ३७, खारघर ४४,  तळोजा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.   

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २१६१० कोरोनाबाधित रूग्णांपैकी १९४७९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५०० जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १६३१ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -  

खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 मुंबईसाठी मोठा निर्णय! मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजूरमार्गमध्ये होणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा