Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे ११५ नवे रुग्ण

पनवेल महापालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ११५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे ११५ नवे रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ११५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये खारघर आणि कामोठ्यातील रुग्णाचा समावेश आहे. तसंच पालिका हद्दीतील ६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.   

गुरूवारी आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये पनवेल येथील ३२, कामोठे मधील  २३, खारघरमधील २८, नवीन पनवेल मधील ११, खांदा काॅलनी मधील ५, कळंबोलीमधील ५ पापडीचा पाडा येथील २, घोट गावातील २, तसेच रोडपाली (बौध्दवाडी), तोंडरे, नावडे, आसुडगाव, खिडुकपाडा, घोटकॅम्प (तळोजा फेज-२) पेणधर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णांचा आकडा २३९२ वर गेला आहे. यांपैकी १४५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आतापर्यंत ७९ जणांचा मूत्यू झाला आहे. सध्या कोरोनाच्या ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा