Advertisement

धारावीत सोमवारी १२ नवीन रुग्ण

जी उत्तर विभागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत ८२ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ६२१६ वर पोहोचली आहे.

धारावीत सोमवारी १२ नवीन रुग्ण
SHARES

धारावीत सोमवारी केवळ १२ नवीन रुग्ण सापडले आहेत. येथील रुग्णांची संख्या आता २५८५  वर पोहोचली आहे. यामधील २२५१ कोरोनामुक्त झाले आहेत.तर केवळ ७८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

 धारावी नियंत्रणात आली असली आता दादर-माहीम मधील रुग्णसंख्या काहीशी वाढताना दिसत आहे. दादरमध्ये सोमवारी ४१ नवीन रुग्ण सापडले आहेत. येथील रुग्णांची एकूण संख्या १८७० इतकी झाली आहे. तर ४९९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये २९ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १७६२ इतकी झाली आहे. येथे सध्या तर २४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. जी उत्तर मध्ये सध्या एकूण ८१७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जी उत्तर विभागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत ८२ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ६२१६ वर पोहोचली आहे.  त्यात धारावी २५८५, दादर १८७० तर माहीम १७६२ रुग्णांचा सामवेश आहे. तर धारावीमध्ये २२५१,दादरमध्ये १२९० तर माहीम मध्ये १४४७ असे एकूण ४९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 



हेही वाचा - 




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा