Advertisement

कोरोनाचा हाहाकार ! राज्यात अवघ्या दोन दिवसात कोरोनाचे 101 बळी, 1278 नवे रुग्ण

रविवारी झालेल्या 53 मृत्यूमध्ये पुरूष 33 आणि 20 महिलांचा समावेश आहे.

कोरोनाचा हाहाकार ! राज्यात अवघ्या दोन दिवसात कोरोनाचे 101 बळी, 1278 नवे रुग्ण
SHARES


देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात शनिवारी कोरोना रुग्णांनी 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात रविवारी दिवसभरात 1278 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात 53 जणांचा बळी गेला आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवसात सर्वाधित मृत्यू रविवारी झाल्याचे सांगितले जात आहे. तर 399 जणांना रविवारी घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 22 हजार 171 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तब्बल 101 जणांचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या  2 लाख  38 हजार 766 नमुन्यांपैकी  2 लाख 15  हजार 903 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  22 हजार  171 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख  44 हजार 327  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 14 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर  शनिवारी  आणि रविवार या दोन दिवसात 101 जणांचा महामारीने  बळी घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या 832 आता  इतकी झाली आहे.

 रविवारी मृत पावलेल्या 53 नागरिकांमध्ये मुंबईतील 19 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे 5, जळगाव 5, धुळे शहरात 2, धुळे ग्रामीण 1, पिंपरी चिंचवड 1,  अहमदनगर, औरंगाबाद, नंदूरबार, सोलापूर आणि वसई विरार परिसरात प्रत्येक 1 मृतांची संख्या आहे. माञ  मालेगावत, या आजाराने 14 जणांचा बळी घेतला आहे. रविवारी झालेल्या 53  मृत्यूमध्ये पुरूष 33 आणि 20 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 19 रुग्ण आहेत तर 30 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षाच्या खालील आहेत. या 36 मृतांपैकी 27 जणांमध्ये (75 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती

कोरोना बाधित रुग्णांमधील 59 टक्के म्हणजेच 5228 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे विरहित आहेत. 

39 टक्के म्हणजेच 3209 रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्येम लक्षणे आढळून आली आहेत.

फक्त 5 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 म्हणजेच 3 टक्के नागरिकांना आँक्सीजनची आवश्यकता, तर 92 रुग्ण म्हणजेच 1 टक्का रुग्ण व्हँन्टीलेटरवर आहेत. 

 इतर 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा