Advertisement

दुसऱ्या दिवशी रेल्वे स्थानकात १३,२५३ प्रवाशांची तपासणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या वाढविल्या आहेत.

दुसऱ्या दिवशी रेल्वे स्थानकात १३,२५३ प्रवाशांची तपासणी
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या वाढविल्या आहेत. तसंच, दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली असून, महाराष्ट्रातील नागरिकांना यामधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या केल्या जात आहेत.

बुधवारपासून रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी करण्यास सुरूवात केली असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ३ प्रवासी बाधित आढळले. दिवसभरात ६ प्रमुख स्थानकांवर १३ हजार २५३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. राजस्थान, दिल्ली, गोवा आणि गुजरात या ४ राज्यांतून सौराष्ट्र मेल, बिकानेर-दादर, भुज-दादर, अजमेर एक्स्प्रेस या गाड्यांमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांची गुरुवारी तपासणी करण्यात आली.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, बोरिवली ६ सहा प्रमुख स्थानकांवर महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांनी आपली यंत्रणा उभी केली होती. त्यात १३,२५३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यात दादर स्थानकांवर दोन प्रवासी तर वांद्रे टर्मिनस स्थानकावर एक प्रवासी बाधित आढळला. बुधवारी दिवसभरात १० प्रवासी बाधित आढळले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा