Advertisement

राज्यात बुधवारी नवीन रुग्णसंख्या १३ हजारांच्या वर

ही रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या मानली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात बुधवारी नवीन रुग्णसंख्या १३ हजारांच्या वर
SHARES

राज्यात रोज कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. बुधवारी तर कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात बुधवारी कोरोनाचे १३,६५९ नवीन रुग्ण आढळले. ही रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या मानली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बुधवारी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ९ हजार ९१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.मृतांचा एकूण आकडा आता ५२ हजार ६१० इ झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३४ टक्के आहे. आतापर्यंत २० लाख ९९ हजार २०७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९३.२१ टक्के एवढे झाले आहे. 

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७१ लाख १५ हजार ५३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ५२ हजार ५७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७१ हजार १८७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार २४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत असल्याने स्थानिक प्रशासन ठिकठिकाणी निर्बंध लादत आहेत. मात्र, संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा