Advertisement

राज्यात बुधवारी १५ हजार १६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात सध्या करोनाचे २ लाख १६ हजार १६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २७ हजार ९९० रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

राज्यात बुधवारी १५ हजार १६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
SHARES

राज्यात बुधवारी कोरोनाचे (coronavirus) नवीन १५ हजार १६९ रुग्ण आढळले. तर २९ हजार २७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच २८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  मृत्यूंचा आकडा आकडा घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत (mumbai) ९२५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १६३२ रुग्ण बरे झाले आहेत. 

आतापर्यंत एकूण ९६ हजार ७५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के इतका झाला आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या ५७ लाख ७६ हजार १८४ झाली आहे. तर ५४ लाख ६० हजार ५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  राज्याचा रिकव्हरी रेट ९४.५४ टक्के  झाला आहे. 

महाराष्ट्रात (maharashtra) सध्या करोनाचे २ लाख १६ हजार १६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २७ हजार ९९० रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात १८ हजार ८६२, मुंबई महापालिका क्षेत्रात १८ हजार ४७८, ठाणे जिल्ह्यात १७ हजार ३४१ तर सातारा जिल्ह्यात १६ हजार ९७९ रुग्ण  उपचार घेत आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह. सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

१    मुंबई मनपा ९२३

२    ठाणे  १५४

३    ठाणे मनपा १२५

४    नवी मुंबई मनपा  ८७

५    कल्याण डोंबवली मनपा  १३५

६    उल्हासनगर मनपा ३४

७    भिवंडी निजामपूर मनपा ३

८    मीरा भाईंदर मनपा १०३

९    पालघर     २४५

१०   वसईविरार मनपा  १४७

११   रायगड     ५५२

१२   पनवेल मनपा     १०८

ठाणे मंडळ एकूण  २६१६

१३   नाशिक     ३८३

१४   नाशिक मनपा    २४५

१५   मालेगाव मनपा   १०

१६   अहमदनगर ७११

१७   अहमदनगर मनपा ६२

१८   धुळे  ५२

१९   धुळे मनपा  ३६

२०   जळगाव    १३७

२१   जळगाव मनपा    १५

२२   नंदूरबार    १९

नाशिक मंडळ एकूण     १६७०

२३   पुणे ग्रामीण ९७३

२४   पुणे मनपा  ५०१

२५   पिंपरी चिंचवड मनपा    ३४६

२६   सोलापूर    ६२३

२७   सोलापूर मनपा    २५

२८   सातारा     १४६१

पुणे मंडळ एकूण  ३९२९

२९   कोल्हापूर   १११४

३०   कोल्हापूर मनपा   ३३९

३१   सांगली     ९२५

३२   सांगली मिरज कुपवाड मनपा   २२९

३३   सिंधुदुर्ग    ५५८

३४   रत्नागिरी   ७११

कोल्हापूर मंडळ एकूण   ३८७६

३५   औरंगाबाद   ९९

३६   औरंगाबाद मनपा  ६५

३७   जालना     १११

३८   हिंगोली     ५७

३९   परभणी     ३१

४०   परभणी मनपा    १६

औरंगाबाद मंडळ एकूण  ३७९

४१   लातूर ११२

४२   लातूर मनपा ३४

४३   उस्मानाबाद २७३

४४   बीड  ३७१

४५   नांदेड ३३

४६   नांदेड मनपा १६

लातूर मंडळ एकूण ८३९

४७   अकोला     १२३

४८   अकोला मनपा    ८६

४९   अमरावती   २७३

५०   अमरावती मनपा  ८८

५१   यवतमाळ   १८९

५२   बुलढाणा    ७८

५३   वाशिम     ११८

अकोला मंडळ एकूण    ९५५

५४   नागपूर     ७५

५५   नागपूर मनपा    १७९

५६   वर्धा  २५१

५७   भंडारा १०८

५८   गोंदिया     ५७

५९   चंद्रपूर १३५

६०   चंद्रपूर मनपा ११

६१   गडचिरोली  ८९

नागपूर एकूण     ९०५



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा