राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ७ हजार ६०३ रुग्ण आढळले. तर १५ हजार २७७ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत ४७८ नव्या रुग्णांचे निदान झालं आहे. तर ७०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३ हजार ०७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण १५ हजार ६३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के झालं आहे. रुग्णदुपटीचा कालावधी आता ९२६ दिवसांवर गेला आहे.
राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४१,८६,४४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,६५,४०२ (१३.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८२,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,०८,३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
हेही वाचा -
मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार
तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले