Advertisement

राज्यात १५ हजार ५१ नवीन रुग्ण, ४८ रूग्णांचा मृत्यू

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकार निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे असा इशारा दिला आहे.

राज्यात १५ हजार ५१ नवीन रुग्ण, ४८ रूग्णांचा मृत्यू
SHARES

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे १५ हजार ५१ नवीन रुग्ण आढळले. तर ४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. १०,६७१ रुग्ण  बरे होऊन घरी परतले आहेत. 

आतापर्यंत राज्यात ५२ हजार ९०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २१,४४,७४३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०७ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ (१३.२३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

 दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. त्यापाठोपाठ आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकार निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे असा इशारा दिला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा