Advertisement

क़ुर्ल्यात लेप्टोने घेतला मुलाचा बळी


क़ुर्ल्यात लेप्टोने घेतला मुलाचा बळी
SHARES

क़ुर्ल्यात लेप्टोमुळे १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार घेत असताना या मुलाचा मृत्यू झाल्याचं मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं.

क़ुर्ल्यातील मिलिंद नगर इथं राहणाऱ्या प्राचील काळे या १५ वर्षीय मुलाला अचनाकपणे ताप आल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तापासोबत त्याला अंगदुखी आणि उलटयांचा त्रास होत होता. त्यानंतर प्राचीलला रक्ताच्या उलट्या होऊन त्याची प्रकृती अजूनच बिघडली. त्यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


फुटबाॅल खेळणं जीवावर बेतलं

पावसामुळे रस्त्यावर घाण पाणी साचतं. त्यामध्ये उंदीर, मांजरीची विष्ठा मिसळल्यास लेप्टोचे विषाणू पाण्यात जातात. प्राचील अशाच घाण पाण्यात फुटबॉल खेळाल्याने त्याला लेप्टोस्पायरोसीस हा आजार झाला. त्यातच तो दगावल्याचं डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं.



हेही वाचा-

महिलेच्या पोटात १५ सेमीची गाठ, डी. वाय. पाटील हाॅस्पिटलमध्ये दुर्मिळ शस्त्रक्रिया

अखेर धनश्रीला मिळाले हृदय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा