Advertisement

मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, हिवताप, काविळ असे विविध संसर्गजन्य आजार पसरतात.

मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश
SHARES

मुंबईत दररोज कोरोनाच्या (corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच दुसरीकडं मलेरिया आजारानंही डोकं वर काढलं होतं. मलेरियानं दिवसाला अनेकजण ग्रस्त होत असल्यानं महापालिकेच्या डॉक्टरांच्या त्रासात भर पडली होती. त्यामुळं नागरिकांना योगय सुरक्षा मिळावं यासाठी महापालिकेच्या डॉक्टरांनी (bmc doctor) शर्तीचे प्रयत्न व आपल्या जीवाची बाजी लावत मलेरियाच्या संकटातून मुंबईकरांना सुखरूप बाहेर काढलं. तसंच, मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश मिळालं आहे. 

पावसाळ्यात (mumbai rains) उद्भवणारे मलेरिया, डेंग्यू, काविळ, स्वाइन फ्लू या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका आरोग्य विभागाला यश मिळालं आहे. मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ५३६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. मात्र, यावर्षी ११ ऑक्टोबरपर्यंत १६० रुग्ण आढळल्यानं गतवर्षीच्या तुलनेत यंदा विविध आजारांची रुग्णसंख्या कमी झाली आहे.

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, हिवताप, काविळ असे विविध संसर्गजन्य आजार पसरतात. यंदा कोरोनाचं संकट ओढावल्यानं पावसाळी आजारांना रोखणं आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान होतं. मात्र, कोरोनापाठोपाठ पावसाळी आजारांवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. 

मुंबईभरात जंतुनाशक फवारणी, डास प्रतिबंधक फवारणी करणं, घरोघरी जाऊन तपासणी करणं, स्वच्छता उपक्रम, नागरिकांमध्ये पावसाळी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती करणं त्यामुळं चांगलंच यश आलं आल्याची माहिती मिळते. 

ऑक्टोबर महिन्यातील रुग्णसंख्या

आजार    
२०१९    
२०२०
मलेरिया    
५३६    
१६०
लेप्टो    
३०    
१५
डेंग्यू    
४२    
०१
गॅस्ट्रो    
३८६    
३१
हिपेटायटिस 
७०    
०३
स्वाइन फ्लू    
०४    
००
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा