Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १७५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१९ ऑगस्ट) १७५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २ मृत्यूंची नोंद झाली आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी १७५ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (१९ ऑगस्ट) १७५ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये नवीन पनवेेल आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

 सोमवारी १८९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील २९, कामोठ्यातील ३१, खांदा कॉलनीतील २१, खारघरमधील ३६, पनवेलमधील २७,  नवीन पनवेलमधील २६, तळोजा येथील ५ रुग्णाचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ९५६९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ७९७५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून २४७ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३४७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये तलाव, चौपाट्यांवर गणपती विसर्जनास बंदी

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा