Advertisement

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी १७६ नवीन रुग्ण

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी (८ सप्टेंबर) १७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी १७६ नवीन रुग्ण
SHARES

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी (८ सप्टेंबर) १७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूची आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.   

मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण १४,१५२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ४४८ लोकांचा बळी गेला आहे. मंगळवारी १६६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११,९१८ रुग्ण बरे झाले आहेत

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविला होता. परंतु आता ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात अनलॉक ४.० देखील सुरू झाली आहे.

पाच महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर सोमवारपासून मीरा-भाईंदर शहरातील मॉल्स उघडे करण्याची परवानगी पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे मॉल्समधील व्यापारी आणि कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले.

मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाने मॉलवरील निर्बंध उठविले असले तरी सामाजिक अंतराचे व इतर नियमांचे व्यवस्थापनाने पालन न केल्यास मॉल पुन्हा बंद करण्याचा इशारा दिला आहे. ५ ऑगस्टपासून राज्यातील मॉलवरील निर्बंध राज्य सरकारने उठविले होते. मात्र मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने शहरातील परिस्थिती नियंत्रणात न असल्यामुळे सर्व मॉल्स बंदच ठेवण्यात आले होते. 



हेही वाचा -

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा