Advertisement

नवी मुंबईतील आयटी कंपनीत १९ कर्मचाऱ्यांना कोरोना

नवी मुंबईतील महापेमधील एका आयटी कंपनीमध्ये 19 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

नवी मुंबईतील आयटी कंपनीत १९ कर्मचाऱ्यांना कोरोना
SHARES

नवी मुंबईतील महापेमधील एका आयटी कंपनीमध्ये 19 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. मिलेनियम बिझनेस पार्कमधील आय क्लाऊड आयटी कंपनीतील हे कर्मचारी आहेत.   

कंपनीत काम करणाऱ्या कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्यासह अन्य सहकाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात 19 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले.  यातील 19 पैकी 7 कामगार नवी मुंबईतील राहणारे आहे. या सर्व 19 कामगारांवर वाशीतील मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहे. खबरदारी म्हणून आयटी कंपनीतील इतर कामगारांची आता कोरोना चाचणी होणार आहे. 

 या 19 कर्मचाऱ्यांची चाचणी थायरोकेअरमध्ये करण्यात आल्याने या सर्वांची चाचणी पुन्हा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांच्या स्वाबचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी मुंबईत पाठवण्यात आले आहेत.या घटनेने आता नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ८० पेक्षा अधिक झाली आहे. संचारबंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार कंपनीत आले कसे असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या कंपनीवर आता संचारबंदीचे उल्लघंन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.



हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा