Advertisement

नवी मुंबईत जुलैमध्ये तब्बल २ लाख १८ हजार चाचण्या

पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. जास्तीत नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यावर पालिकेने भर दिला आहे.

नवी मुंबईत जुलैमध्ये तब्बल २ लाख १८ हजार चाचण्या
SHARES

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने चाचण्यांवर अधिक भर दिला आहे. जुलै महिन्यात पालिकेने तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या केल्या आहेत. यामध्ये 1 लाख 63 हजार 506 अँटिजेन तर 52 हजार 910 आरटी-पीसीआर टेस्टचा समावेश आहे. 

पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. जास्तीत नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यावर पालिकेने भर दिला आहे. पालिका दिवसाला जवळपास 8 हजार नागरिकांच्या चाचण्या करत आहे. जुलै महिन्यात 2 लाख 18 हजार चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत एकूण 13 लाख 94 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

रोज सर्वाधिक गर्दी होत असलेल्या एपीएमसी मार्केटमधील पाचही बाजारांमध्ये दिवसाला दोन हजार कोरोना चाचण्या होत आहे. पालिका आयुक्त रोज संध्याकाळी  सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वेबसंवादद्वारे चर्चा करत आहे. यामध्ये कोरोनाविषयीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. या चर्चेतील निरीक्षणानुसार रुग्ण आढळलेल्या इमारतीतील सर्व रहिवाशांची चाचणी केली जात आहे. 

मागील महिन्याभरापासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. लक्षणे नसलेली परंतु कोविडची लागण झालेले रुग्ण कोरोनाचे वाहक ठरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी चाचण्या उपयुक्त ठरत असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा