Advertisement

राज्यात आणखी २ जणांना ऑमिक्रॉनची लागण

राज्यात आणखी २ जणांना ऑमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात आणखी २ जणांना ऑमिक्रॉनची लागण
(Representational Image)
SHARES

राज्यात आणखी २ जणांना ऑमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एक लातूर आणि दुसरा पुण्यात आढळल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. पुण्यात ३९ वर्षीय महिलेला ऑमिक्रॉनची लागण झाली असून लातूरमध्ये ३३ वर्षीय पुरुषाला ऑमिक्रॉनची लागण झाली आहे.

१३ डिसेंबर रोजी या दोघांना ऑमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं आता राज्यातील ऑमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. दरम्यान, देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ऑमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

मुंबईसह जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनमुळं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगभरात ऑमिक्रॉनचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य सरकारनं तयारीला सुरूवात केली आहे. मात्र, असं असलं तरी परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांमध्ये ऑमिक्रॉनची लक्षणं आढळत आहेत.

या दोन्ही रूग्ण दुबईहुन आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत ३ जण संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. या तिघांची कोरोना चाचणी केली असता त्यांच्या अहवाल निगेटीव्ह आला.

महाराष्ट्राव्यतिरिक्त ५ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये (दिल्ली आणि चंदीगड) ऑमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. राजस्थान (९), कर्नाटक (३), गुजरात (४), केरळ (१) आणि आंध्र प्रदेश (१) आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली (२) आणि चंदीगड (१).

महाराष्ट्रात सोमवारी कोविड-१९ संसर्ग आणि संबंधित मृत्यूंमध्ये घट झाली असून, ५६९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच, ५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा