Advertisement

अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत २० टक्के वाढ

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र, मागील आठवड्यापासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

अनलॉकनंतर मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत २० टक्के वाढ
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र, मागील आठवड्यापासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. अनलॉकनंतर मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे .जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत स्थिरावलेली रुग्णसंख्या वाढत आहे. 

गणेशोत्सव आणि अनलॉकची सुरु झालेली प्रक्रिया हे पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरली आहे.  ऑगस्ट महिन्यात मुंबईत १ हजारांपेक्षा कमी रुग्ण रोज आढळत होते.  मात्र, आता पुन्हा दीड हजाराहून अधिक रुग्ण मुंबईत सापडत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी १८ हजारांच्या आसपास असलेले सक्रिय रुग्ण आता २२ हजारांपर्यंत पोहोचले आहेत.  

४ सप्टेंबर रोजी २२ हजार २२० सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.  ३ सप्टेंबर रोजी २१हजार ४४२, २ सप्टेंबर रोजी २० हजार ८१३, १ सप्टेंबर रोजी २० हजार ६५ आणि ३१ ऑगस्ट रोजी २० हजार ५५४ सक्रिय रुग्ण होते. मुंबईत शुक्रवारी १९२९, गुरुवारी १५२६, बुधवारी १६२२, मंगळवारी ११४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. 

खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची संख्या वाढली आहे. अनलॉकमुळे प्रवास, वाहतूक वाढल्याने रुग्णसंख्या वाढत आहे.  ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.



हेही वाचा -

बेस्ट प्रवासात अंतरनियमांकडं प्रवाशांचं दुर्लक्ष

सुशांत आत्महत्या प्रकरण : अभिनेत्री रियाला होऊ शकते केव्हाही अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा